IPLचा TRP कसा काय घसरला?? जाणून घेऊ यामागील कारणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असली तरी यंदाच्या आयपीएलला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आयपीएलच्या टीआरपी मध्ये 2008 पासून आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यातील व्ह्यूअरशिपमध्ये एकूण 33 टक्क्यांनी घट झाल्याचं समजत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कि अशी काय कारणे आहेत ज्यामुळे आयपीएल आणि बीसीसीआयला मोठा फटका बसला आहे

1] गेल्या 6 महिन्यात दुसऱ्यांदा IPL चे आयोजन-
मागील वर्षी कोरोना काळामुळे आयपीएलचा दुसरा सिझन सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात आयोजीत केला होता. त्यानंतर आता ६ महिन्यांनीच आयपीएलचा पुढील हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे जी उत्कंठा चाहत्यांच्या मनात असायला हवी होती ती पाहायला मिळाली नाही

2] बड्या खेळाडूंची अनुपस्थिती-
यंदाच्या आयपीएल मध्ये एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, ख्रिस गेल सारखे दिग्गज खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळाले नाही. त्याचा मोठा फटका आयपीएलचा बसला असल्याची शक्यता आहे. कारण हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामा पासून खेळत असून भारतीय क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत होत.

3] Auction मध्ये खेळाडूंची झालेली अदलाबदली
यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ असून फेब्रुवारी महिन्यात सर्व खेळाडूंसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेक दिग्गज खेळाडू लिलावात दुसऱ्या संघाकडे गेले. हैद्राबादचा राशिद खान गुजरात कडे, पंजाबचा राहुल लखनऊ कडे, मुंबईचा हार्दिक पंड्या गुजरातकडे, असे अनेक बदल चाहत्यांच्या मनाला न पटल्याने देखील आयपीएल पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे

4] जगभरात T-20 च्या अनेक स्पर्धा

आयपीएल सोबतच जगभरात अनेक देशांत T20 च्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. त्यामध्ये वेस्ट इंडिज येथील CPL, ऑस्ट्रेलिया मधील BBL, पाकिस्तान मधील PSL यांचा समावेश आहे, त्यामुळे कुठेतरी T20 क्रिकेट बाबत चाहत्यांच्या मनात पूर्वीसारखी ओढ राहिली नाही

5] मुंबई- चेन्नईचा घसरलेला फॉर्म

ज्या २ संघानी आयपीएल आत्तापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवले ते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघाचे यंदाच्या आयपीएल मधील प्रदर्शन नक्कीच चांगले नाही राहिले. मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत खेळलेले सर्वच्या सर्व पाचही सामने गमावले आहेत तर दुसरीकडे चेन्नईला देखील ५ सामन्यात अवघा १ विजय मिळवता आलाय. त्याचाही थेट परिणाम आयपीएलच्या टीआरपी वर झालेला पाहायला मिळत आहे कारण या दोन्ही संघाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे

Leave a Comment