ऊष्माघातामुळे मृत्यू कसा होतो? सर्वाधिक त्रास कोणत्या व्यक्तींना?

Heat Stroke
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रगरगत्या उन्हामुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास झाला. आत्तापर्यंत यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात? आणि ऊष्माघातामुळे मृत्यू कसा होतो? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील. चला याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया….

ऊष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हंटल जाते. जास्तीच्या तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील ऊष्णता- संतूलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधिंमुळे आपल्याला शरीराला सहन होत नाही आणि त्यामुळे ऊष्माघात होतो. अतिउष्णतेमुळं शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. अशावेळी योग्य उपचार वेळेवर मिळाले नाही तर त्या व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व मृत्यू होण्याची शक्यता असते.

उष्णाघाताचा त्रास कोणाला होऊ शकतो?

1) 1 वर्षाखाली आणि 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलं
2) वयोवृद्ध व्यक्ती
3) हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती
4) गरोदर महिला
5) लठ्ठपणा, किंवा जास्त पाणी न पिणारे लोक

उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावे ?

1) उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो उन्हात जाणे टाळा. रगरगत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शक्यतो घरीच थांबा. तरी सुद्धा बाहेर पडला तर डोक्यावर टोपी घाला.

2) किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी 10 मिनिटांपूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा.

3) उन्हाच्या कडाक्याच्या मद्यपान करू नका.

4) जास्तीत जास्त पाणी प्या. बाहेर पडताना पाण्याची बाटली कायम जवळच ठेवा.