औरंगाबाद । जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रभर पोहचला. अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. मात्र अद्याप पोलीस प्रशासनाकडून यावर काहीही ठोस सांगण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. एका महिलेसोबत हे किर्तनकार सदर व्हिडिओत नको त्या अवस्थे दिसून आल्याने चर्चांना उधाण आले होते. याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यांनतर व्हिडिओतील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र वेळीच दवाखान्यात हलवल्याने त्यांचा प्राण वाचला आहे.
विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. या व्हिडिओनंतर इतर संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आज तृप्ती देसाई यांनी देखील गृहमंत्र्यांकडे याबाबत कारवाईची मागणी केली आहे. तसेच सदर प्रकार दोघांच्या संमतीने झाला असेल तर यात काहीही वावगे नाही असंही म्हणणार्यांचा एक गट आहे.