ग्रामपंचायत निवडणुकीतही मोदींचा फोटो, पंतप्रधान आहे की सरपंच ? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपने बॅनर वरील सोनिया गांधी यांच्या फोटो वरून शिवसेनेवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या पक्षाच्या बॅनर वर एकाच व्यक्तीचा फोटो असतो, सरपंचपदालाही एकच फोटो पंतप्रधान पदालाही एकच फोटो. म्हणजे हेच आम्हाला कळतच नाही की सरपंचपदासाठी ही व्यक्ती उभी आहे की पंतप्रधान पदासाठी ? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपची खिल्ली उडवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदुत्वाची दिशा दिली, ते अडवाणी आज कुठे आहेत? ना अटलजींचा पत्ता ना अडवाणीजींचा. सरपंचपदालाही एकच फोटो पंतप्रधान पदालाही एकच फोटो. म्हणजे हेच आम्हाला कळतच नाही की सरपंचपदासाठी ही व्यक्ती उभी आहे की पंतप्रधान पदासाठी ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला

दरम्यान, तुम्ही म्हणजे हिंदुत्त्व नाही असे म्हणत युती शिवसेनेने नव्हे तर भाजपने तोडली अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी भाजपला करून दिली. शिवसेनेने झेंडा, रंग युती कधीही बदलली नाही. आम्ही भाजपला सोडलं, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही. हिंदुत्त्वाच्या गप्पा मारणाऱ्यानी मेहबुबा मुफ्ती सोबत युती कशी केली असा सवाल करत भाजपचा नकली भगवा, बुरखा फाडायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल

 

Leave a Comment