हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात UPI हे खूपच लोकप्रिय झाले आहे. ते सर्वात जलद आणि सोप्या पेमेंट पद्धतींपैकी एक बनले आहे. मात्र याच्या मदतीने फक्त एका लिमिट पर्यंतच ट्रान्सझॅक्शन करता येतात आणि हे लिमिट बँकेवर अवलंबून असते. हे लक्षात घ्या की, येथे ट्रान्सझॅक्शन लिमिट म्हणजे एकाच वेळी केलेला व्यवहार आणि डेली लिमिट म्हणजे संपूर्ण दिवसाचे जास्तीत जास्त ट्रान्सझॅक्शन लिमिट. चला तर मग आज आपण काही बँकांच्या यूपीआय ट्रान्सझॅक्शन लिमिटबद्दलची माहिती जाणून घेउयात …
State Bank Of India – भारतातील सर्वात मोठ्या बँक असलेल्या SBI चे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट 1 लाख रुपये आहे. याशिवाय, त्याचे डेली ट्रान्सझॅक्शन लिमिट देखील 1 लाख रुपये आहे.
Axis Bank – UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि बँकेचे डेली लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपये आहे.
Punjab National Bank – PNB ची ट्रान्सझॅक्शन लिमिट 25,000 रुपये आहे तर डेली यूपीआय लिमिट 50,000 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे.
HDFC Bank – या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेकडून यूपीआय ट्रान्सझॅक्शन आणि डेली लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, नवीन ग्राहकाला पहिल्या 24 तासांत फक्त 5,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन करता येतील.
Bank Of India – या बँकेने देखील UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि डेली लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपये निश्चित केले आहे.
ICICI Bank – या बँकेची UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि डेली लिमिट देखील 10,000-10,000 रुपये आहे. मात्र Google Pay युझर्ससाठी या दोन्ही लिमिट 25,000 रुपये आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!
rave party काय असते ??? मोठ्या घरातील तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढते आहे ???
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ