Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या करण्याचे अनेक मार्ग आहेत Sovereign Gold Bond हा त्यापैकीच एक आहे. सोन्यामधील इतर गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा ते जास्त सुरक्षित आहे. तसेच यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याज देखील मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी बॉण्ड आहेत, जे सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केले जातात. हे निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना देखील विकले जातात.

या Sovereign Gold Bond मध्ये कमीत कमी एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. तसेच कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतचे गोल्ड बाँड खरेदी करू शकतील. ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी जास्तीत जास्त खरेदीचे लिमिट 20 किलो आहे.

Explainer: What is the 'Sovereign Gold Bonds Scheme'?

टॅक्सचे कॅल्क्युलेशन गणित

Sovereign Gold Bond (SGB) मध्ये वर दरवर्षी गुंतवणूकदारांना निश्चित व्याज दिले जाते. त्याचा व्याज दर वार्षिक 2.5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. हे व्याज आयकर कायदा, 1961 अंतर्गत करपात्र असेल. हे लक्षात असू द्यात कि, एका आर्थिक वर्षात गोल्ड बॉण्ड्समधून मिळालेले व्याज हे इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या करदात्याच्या उत्पन्नामध्ये गणले जाते. त्यामुळे करदाता कोणत्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येतो त्यानुसार त्यावर टॅक्स आकारला जाईल. मात्र, गोल्ड बाँड्समधून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही TDS नसेल.

मॅच्युरिटी कालावधी किती आहे ???

Sovereign Gold Bond चा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे. तसेच 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला मिळणारा रिटर्न पूर्णपणे टॅक्स फ्रीअसतो. हे बॉण्ड्स जास्त आकर्षक बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना फिजिकल गोल्ड कडून नॉन फिजिकल गोल्डकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेला हा विशेष टॅक्स बेनिफिट्स आहे.

Sovereign Gold Bond Scheme, घर बैठे खरीदें सस्ता सोना

सॉव्हरेन गोल्ड बाँडमधून मुदती आधीच बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत. तर असे केल्याने बाँड रिटर्नवर विविध टॅक्स रेट द्यावे लागतात. कसे ते जाणून घ्या…

लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स

Sovereign Gold Bond चा लॉक-इन कालावधी साधारणपणे 5 वर्षांचा असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि मुदतपूर्तीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून मिळणारा रिटर्न हा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये ठेवला जातो. अतिरिक्त उपकर आणि इंडेक्सेशन बेनिफिट्ससह लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दर 20 टक्के आहे.

gold bond: Should you invest in the new sovereign gold bond? - The Economic Times

गोल्ड बॉण्ड कधी विकता येतील ???

जर गोल्ड बॉण्ड स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट केले गेले असतील तर ते RBI ने सूचित केलेल्या तारखेपासून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केले जाऊ शकतात. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यापासून 3 वर्षांच्या आत विकले गेल्यास, मिळालेला रिटर्न हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जाईल. हे गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यावर लागू टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जाईल. दुसरीकडे, खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गोल्ड बॉण्ड विकले गेल्यास, मिळालेला रिटर्न लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जाईल आणि अतिरिक्त उपकर आणि इंडेक्सेशन बेनिफिट्ससह 20 टक्के दराने टॅक्स आकारला जाईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा

Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!

Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!

फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच

Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा