टीम, HELLO महाराष्ट्र । अनेक जण या अनुभवाशी सहमत असतील कि , जाड लोक साधं पाणी जरी प्यायल तरी त्यांना शरीर जड-जड वाटायला लागते . तर काही जण कितीही आणि काहीही खाल्लं तरी सडपातळ राहतात . अनेक लोक बारीक होण्यासाठी कठोर डाएट पाळतात , पण तरीही बारीक होत नाहीत . खरंतर बारीक होण्यासाठी कमी खाण आणि अधिक व्यायाम करणं हा अत्यंत चुकीचा पर्याय आहे . वजन कमी करण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्यासह हे उपाय अमलात आणा नक्कीच फायदा होईल
१. मीठ खाणे टाळा
सकाळी उठल्यानंतर चेहेऱ्यावर जर सूज दिसत असेंन तर तुमच्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण अधिक आहे समजावे. मिठाच्या अधिक सेवनाने किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाणी बाहेर पडण्यास अडथळे येतात . शरीरातील या अधिक पाण्याने वजन कमी होत नाही .
२. व्यायाम
व्यायाम एकाच रुटीनमध्ये केल्याने सुरवातीला वजन घटल्याचे दिसले तरी हळू हळू त्यात बदल दिसून येणे बंद होते . शरीराला या व्यायाम प्रकाराची सवय होते आणि शरीर त्याला परिणाम देणे बंद करते . त्यामुळे रोज सारखाच व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करावा .
३. पौष्टिक पदार्थांचे सेवन
पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हे वजन कमी आणि अधिक करण्यासाठी आवश्यक आहे . परंतु कोणत्याही पदार्थाचे अधिक सेवन करणे हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे . पौष्टिक पदार्थांचे सेवन भलेही वजन वाढवत नसले तरी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र बाधा निर्माण करू शकते .
४. उशिरा जेवण करणे टाळा
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत महत्वाचेआहे . त्यात रात्रीचे जेवण हे नेहमी हलके आणि झोपण्याच्या २ तास आधी करावे . जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे . शतपावली करावी अर्थात केवळ १०० पावले चालावे . त्यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रिया पूर्ण होऊन फॅट्सचे रूपांतर एनरजी मध्ये होते .
५. झोपेच्या वेळा सांभाळा
२४ तास पैकी ८ तास झोप घेणे आवश्यक आहे . दुपारी झोप घेणे टाळावे . वामकुक्षी हि केवळ २० ते ३० मी घ्यावयाची असते .