थकवा घालवून टवटवीतपणा वाढवणारे टोमॅटो सूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Recipe | टोमॅटो सूप म्हटलं की सर्वांच्याच जीभेला पाणी सुटतं. हलका आहार म्हणुन बरेच जण टोमॅटोचे सूप घेणे पसंद करतात. शिवाय या सूपाचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. आज ही ग्रामीण भागात खोकल्याशिवाय अन्य दुखणे असेल तर टोमॅटोचे सार त्या व्यक्तीस पिण्यासाठी दिले जाते. या साराने थकवा तर जातोच तसेच टवटवीतपणा वाढतो आणि पचनसंस्था ही सुधारते. चला तर जाणून घेऊयात कसे केले जाते ‘टोमॅटो सार’..

साहित्य –
१.सात ते आठ लाल आणि मोठे टोमॅटो
२.फोडणीसाठी तूप
३.छोट्या चमचा चिरे
४.हिंग छोटा चमचा
५.मिरची पावडर आवश्यकते नुसार
६.कडीपत्त्याची पाने
७.बारीक चिरलेली कोथिंबीर
८.खिसलेले ओले खोबरे.
९.मीठ चवी नुसार

कृती –

टोमॅटो चिरून एका कढई मंद आचेवर शिजायला ठेवावी.त्यात थोडेसे पाणी घालावे तसेच त्यातच खिडलेला नारळ शिजायला घालावा. त्यातच आवश्यकते नुसार लाल मिरची पावडर घालावी. टोमॅटो शिजल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. एका कढईत तूप तपण्यासाठी ठेवावे त्यात चिरे, हिंग, कडीपत्ता घालावा फोडणी चांगली तापल्यावर त्यात बारीक वाटलेले टोमॅटो घालावे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. एक उखळी आल्यावर गरम गरम टोमॅटो साराचा आस्वाद घ्यावा.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.

Leave a Comment