बनावट क्रिप्टोकरन्सी कशी ओळखायची, क्रिप्टो फसवणूकीपासून संरक्षण कसे करावे जाणून घ्या

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे त्यात घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. म्हणून, कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, एखाद्याने त्याबद्दल सखोल संशोधन केले पाहिजे. सोशल मीडियावर अनेक बनावट क्रिप्टो एक्सचेंज आणि टोकन आहेत जे काही दिवसांत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत आहेत.

प्रत्येक गुंतवणूकदार आणि बिगर-गुंतवणूकदार, जे कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याचा किंवा श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात असतात, ते नेहमी फसवणूक करणाऱ्यांच्या निशाण्यावर असतात. कारण क्रिप्टोकरन्सी व्यवसाय पूर्णपणे फ्री आहे. यावर ना सरकारचे कंट्रोल आहे ना कुठल्या बँकेचे.

अलीकडच्या काही दिवसांत, क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये बरीच अस्थिरता दिसते आहे. स्क्विड गेमवर आधारित कॉइन SQUID, Kokoswap, Ethereum ने काही वेळातच हजारो टक्के नफा मिळवला तर काही टोकन्समध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले.

WazirX चे कायदेशीर आणि अनुपालन प्रमुख शशी प्रकाश झा म्हणतात की,”क्रिप्टो आता मुख्य प्रवाहात आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये तरुण, रिटेल आणि कॉर्पोरेट गुंतवणूकदारांची संख्या वाढतच आहे. ते म्हणाले की,”क्रिप्टो ही उच्च जोखीम असलेली मालमत्ता आहे.”

यामध्ये , फसवणूक करणारे अशा गुंतवणूकदारांना किंवा बिगर-गुंतवणूकदारांना लक्ष्य करतात ज्यांना सहज नफा मिळवायचा आहे आणि जे त्वरित श्रीमंत होण्यासाठी काहीही करतील.

बनावट कॉईन कसे ओळखावे ?
कोणत्याही कॉईनची सत्यता तपासण्यासाठी, ते अल्पावधीत खूप जास्त रिटर्न देण्याचा दावा करत आहे की नाही हे पाहावे लागेल. बनावट कॉईन ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे क्रिप्टो गिव्हवे देण्याचे आश्वासन देणारे स्कॅमर गुंतवणूकदारांना बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी काही कॉईन पाठवण्यास सांगतात. जर ते तुमच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत असतील तर समजून घ्या की ते कॉईन पूर्णपणे बनावट आहे.

शशी प्रकाश झा म्हणतात की,”काही हॅकर्स मोठ्या व्यक्तींचे सोशल मीडिया पेजेस हॅक करतात आणि त्यांच्याद्वारे विशिष्ट क्रिप्टोमध्ये प्रचंड नफा कमावण्याचे आश्वासन देतात. गुंतवणूकदारांनी अशा आश्वासनांपासून आणि दाव्यांपासून नेहमी सावध असले पाहिजे. कोणत्याही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याचा अभ्यास करा. त्याची हिस्ट्री पहा, व्हाइट पेपर्स ची स्टडी करा तसेच क्रिप्टोच्या ऑपरेटर्स आणि एक्सचेंजेसबद्दल संपूर्ण माहिती गोळा करा.

You might also like