Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । mobile phone :आजकाल मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याशिवाय जगणे जवळपास अश्यकच झाले आहे. प्रत्येकजण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवरच घालवतो. मोबाईल फोन हे फक्त मनोरंजनाचे साधनच नाही तर त्याचा उपयोग अभ्यास किंवा इतर काही गोष्टींसाठी देखील केला जातो.

Cell phone battery draining: Tips to keep your device running longer

मात्र अशा परिस्थितीत mobile phone ची बॅटरी लाइफ कमी झाली तर … होय कालांतराने आपल्या फोनच्या बॅटरीचे आयुष्यमान कमी होते. नीट वापर केला तर स्मार्टफोन बरीच वर्षे टिकतो. मात्र फोनची बॅटरी लाइफ काही काळानंतर कमी होत आहे. मात्र या समस्येवर काही उपाय देखील आहेत. आज आपण फोनची बॅटरी लाइफ वाढवता येईल अशा काही उपायांबाबत जाणून घेणार आहोत…

Seven tips for safer mobile phone charging - Saga

1. फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नका

वेळ वाचवण्यासाठी, युझर्स रात्रभर फोन चार्जिंगला लावतात. असे सतत केल्यामुळे mobile phone च्या बॅटरीवर परिणाम होतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते. त्यामुळे, फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवू नका किंवा फोन चार्जिंगला लावून वापरू नका.

Décadas após criação, Bluetooth ainda é "uma tecnologia complicada";  entenda | CNN Brasil

2. फोनचे ब्लूटूथ आणि लोकेशन बंद करा

फोनमध्ये ब्लूटूथ आणि लोकेशन चालूच राहतात. फोन युझर्सनी जीपीएस वापरल्यानंतर तो नेहमी बंद करावा, कारण जीपीएसमुळे mobile phone ची बॅटरी लवकर संपते. त्याच वेळी, ब्लूटूथ देखील वापरल्यानंतरच लगेचच बंद करावा. अनेक वेळा युझर्सकडून बंद केले जात नाही. यामुळे फोनची बॅटरी लगेचच संपुष्टात येते.

900+ App Background Images: Download HD Backgrounds on Unsplash

3. बॅकग्राऊंडला App सुरु ठेवू नका

अनेकवेळा आपण फोनमधील Apps उघडल्यानंतर ते बंद करायला विसरतो. यामुळे, ते बॅकग्राउंडला खुलेच राहतात. मात्र बॅकग्राउंडमध्ये असूनही ते Apps मात्र चालू राहतात आणि त्यामुळे mobile phone ची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे Apps वापरल्यानंतर ते बंद करणे जरुरीचे ठरेल.

DesktopHut - Live Wallpapers for PC and Mobile Phones

4. लाइव्ह वॉलपेपर वापरू नका

अनेक वेळा युझर्स फोनवर लाइव्ह वॉलपेपर ठेवतात. त्यामुळे जेव्हाही फोन वापरला जातो तेव्हा तो सतत इन ऍक्टिव्ह राहतो. आपल्या mobile phone ची बॅटरी लवकर संपण्याचे हे देखील एक कारण आहे. त्यामुळे जर आपल्याला फोनची बॅटरी लाइफ वाढवायची असेल तर लाइव्ह वॉलपेपरचा वापर टाळावा लागेल.

How to get an Always-on display on any Android phone | NextPit

5. Always On Display डिस्प्ले बंद करा

अनेक स्मार्टफोनमध्ये असे फीचर्स आहेत, ज्यामुळे फोनचा डिस्प्ले नेहमी चालू ठेवता येतो. साहजिकच फोनचा डिस्प्ले सतत चालू राहत असेल तर त्याचा परिणाम फोनच्या बॅटरीवर होतो. त्यामुळे हे फीचर बंद ठेवणे केव्हाही चांगले ठरेल. mobile phone

हे पण वाचा :

Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

आधार कार्ड- मतदान ओळखपत्र होणार लिंक; जाणून घ्या प्रोसेस

Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा

Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!