आपल्या Aadhaar ला गैरवापर होण्यापासून वाचवा, बायोमेट्रिकने घरबसल्या असे करा lock

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार म्हणजे आपल्या ओळखीचा 12 डिजिट पर्सनल आइडेंटिफिकेशन नंबर आपल्याला बर्‍याच सेवांसाठी कामाला येतो. यासंदर्भात बरीच कामे त्याच्या ऑनलाईन पोर्टल uidai.gov.in वर करता येतात. अशा प्रकारच्याच एक ऑनलाइन सेवेमुळे युझर्सना बायोमेट्रिक डिटेल लॉक करण्यास किंवा अनलॉक करण्याची परवानगी मिळते ज्यायोगे त्यांचे आधार चुकीच्या वापरापासून वाचवता येऊ शकेलं. आपल्याला हवे असल्यास, आपण आपल्या आधारचे बायोमेट्रिक लॉक करू शकता. UIDAI ने आता ते लॉक करणे किंवा अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे.

बायोमेट्रिक लॉकचे फायदे
आधारमध्ये बायोमेट्रिक लॉक म्हणजे आपले फिंगरप्रिंट आणि डोळ्याच्या बाहुलीचा डेटा लॉक करणे. एकदा बायोमेट्रिक लॉक झाल्यावर आधारधारक किंवा इतर कोणतीही व्यक्ती ऑथेंटिकेशनसाठी ते वापरू शकणार नाही. आधारधारक आवश्यक असल्यास ते अनलॉक देखील करू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

घरबसल्या असे करा ऑनलाईन बायोमेट्रिक लॉक
पहिल्यांदा आधारची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा

आता होम पेजवर जरा खाली या. इथे Aadhaar Services सेक्शन सापडतील. त्यामध्ये Lock/Unlock Biometrics ऑप्शनवर क्लिक करा.

आता येथे आपल्याला आपला 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल. आपल्याला हवे असल्यास, आपण Virtual ID number चा ऑप्शन देखील निवडू शकता.

नंतर व्हेरिफिकेशन साठी कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करा

यानंतर, आपल्याला नवीन पॉप अपमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP भरावा लागेल. यानंतर Submit वर क्लिक करा. यानंतर आपले आधार बायोमेट्रिक लॉक केले जाईल.

अशाप्रकारे आपले बायोमेट्रिक्स अनलॉक करा
आपले बायोमेट्रिक्स अनलॉक करण्यासाठी, लॉक प्रक्रिया पुन्हा करा. यानंतर ‘अनलॉक बायोमेट्रिक’ वर क्लिक करा. या फीचरवर क्लिक करून, आपले बायोमेट्रिक्स काही मिनिटांसाठी अनलॉक केले जातील आणि त्या कालावधी नंतर ते पुन्हा लॉक केले जातील. ऑनलॉकच्या या कालावधीत आपला आधार क्रमांक अधिकृत करण्यासाठी आपण आपल्या फिंगरप्रिंट / डोळ्याच्या बाहुलीच्या बायोमेट्रिक्सचा वापर करू शकता. त्याच वेळी, आपल्याला जर आपले बायोमेट्रिक्स कायमचे अनलॉक करायचे असल्यास ‘डिसेबल लॉकिंग फीचर’ वर क्लिक करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.