नवी दिल्ली । तुम्हाला म्हातारपणासाठी एक मोठा फंड तयार करायचा आहे, जेणेकरून तुम्हांला भविष्याची चिंता लागून राहू नये आणि इतरांवर अवलंबून रहायला लागू नये? जर तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) तुमच्या चिंतेला पूर्णविराम देऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. कारण त्यांना नोकरीनंतर पेन्शन मिळत नाही. NPS ऑनलाइन कसे उघडायचे ते जाणून घ्या.
ऑनलाइन खाते कसे उघडायचे ?
>> सर्वप्रथम तुम्ही NPS ट्रस्टच्या https://www.npstrust.org.in/content/open your nps account online वेबसाईटवर जा.
>> त्यानंतर तुम्ही Individual Category वर क्लिक करा.
>> त्यानंतर आधार किंवा पॅन नंबर टाका. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर यासंबंधीचा वन टाइम पासवर्ड मिळेल. त्याचे व्हेरिफिकेशन करा.
>> यानंतर तुम्ही एकनॉलेजमेंट नंबर मिळविण्यासाठी माहिती सबमिट करा.
>> पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट करा, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चॅनेल निवडा.
>> त्यानंतर नॉमिनी सिलेक्ट करावा लागेल.
>> फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा.
>> यानंतर, टियर I खात्यामध्ये किमान 500 रुपये आणि टियर II खात्यामध्ये किमान 1000 रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक आहे.
ऑफलाइन खाते कसे उघडायचे ?
ऑफलाइन खाते उघडण्यासाठी, तुम्हाला PFRDA ने नियुक्त केलेल्या जवळपासच्या पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स (POPs) ला भेट द्यावी लागेल. सहसा बँका, इन्शुरन्स कंपन्या आणि फायनान्शिअल सर्व्हिस देणार्या कंपन्या यासारख्या बहुतेक फायनान्शिअल संस्था पॉईंट्स आफ प्रेझेन्स म्हणून काम करतात. तुम्हाला एनपीएस ट्रस्टच्या वेबसाइटवर सर्व PoP ची माहिती मिळेल. येथे तुम्हाला NPUS मध्ये खाते उघडण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. यासोबत ओळखपत्र, पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा लागेल. रजिस्ट्रेशन नंतर, प्रारंभिक 500 रुपये कॅश किंवा चेकमध्ये गुंतवले जाऊ शकतात.
NPS वर टॅक्स सूट उपलब्ध आहे
सध्या, इन्कम टॅक्सच्या कलम 80 CCD (1), 80 CCD (1B) आणि 80 CCD (2) अंतर्गत NPS वर टॅक्स सूट उपलब्ध आहे. कलम 80C व्यतिरिक्त NPS वर 1.50 लाख रुपये, तुम्ही आणखी 50,000 रुपयांची सूट घेऊ शकता. म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 2 लाख रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.