हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । महिलांचे केस जितके लांब असतील तितके त्याच्या सौदर्यात भर पडते. महिलांना सर्वात जास्त टेन्शन हे आपले केस योग्य रित्या सांभाळले गेले पाहिजेत. जर मोठ्या प्रमाणात जर केस गळत असतील तर त्यावर अनेक घरगुती उपाय आहे याचा वापर केला गेला पाहिजे. बाहेरच्या विकतच्या प्रॉडक्ट पेक्षा घरगुती उपायांना महत्व दिले गेलं पाहिजे. हिवाळ्यात केसांची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होत जाते. दररोज केस धुने शक्य नाही. त्यामुळे केसं खराब होण्याची शक्यता जास्त असते. केसांच्या समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हलक्या शॅम्पुने केसं धुवा आणि कंडीशनर करणे विसरू नका.
आपल्या डोक्यात तयार होणाऱ्या कोंड्यांमुळे केसं कमकुवत होतात. आपली डोक्याची त्वचा हि फार हलकी असते. जर योग्य प्रमाणात पोषक तत्व त्यांना मिळाले नाही तर याचा त्रास आपल्या हिवाळ्यात कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते. म्हणून डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी नियमितपणे डोक्यात तेल लावणे आवश्यक असते.
तेल मालिश देखील महत्त्वाची आहे. हिवाळ्यात केस ड्राय होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेर जातांना केसांना स्कार्फने झाकून बाहेर पडावे. हिवाळ्यात केसांना जास्त स्प्लिटस पडतात. त्यामुळे अधुन मधून केसांना ट्रीम करत राहा. अनेक वेगवेगळी तेल बाजारामध्ये अगदी स्वस्त रित्या उपलब्ध आहेत त्यातील जे तेल आपल्या केसांना आणि केसांच्या त्वचेला उपयोगी पडत असेल त्याचा वापर आपण आपल्या केसांसाठी केला गेला पाहिजे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’