महाराष्ट्रालाही मोफत कोरोना लस मिळावी – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी साठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी बिहारमध्ये सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याच आवाहन केलंय. भाजपाच्या या निर्णयावरुन भाजपावर टीका होत आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही मोफत लस मिळायला हवी, अस वक्तव्य केले आहे.

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील इतर राज्य काही पाकिस्तानात नाहीत ,इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही का?? असा सवालही अनेकांनी उपस्थित केलाय. तर, शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेचे बाण सोडलेत. ”बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपाने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत.बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपाच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे,” अशा शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यासंदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. काही लोकं महाराष्ट्र सोडून जगभर बोलतात, तामिळनाडूतील राज्य सरकारने मोफत कोरोना लसीची घोषणा केलीय, आता हेच दुटप्पी लोक टीका करत आहेत, असे म्हणत विरोधी पक्षांकडून सोयीनुसार भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी म्हणलं आहे. कोरोना संदर्भात केंद्र सरकार नक्कीच योजना आणेल, पण राज्यानेही त्यात भर घालावी लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment