ऋतिक रोशनने केली CINTAA साठी २० लाखांची मदत; ५००० सदस्यांचे लसीकरण होणार मोफत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA) तील सदस्यांच्या मदतीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. ऋतिकने या असोसिएशनला एक दोन नव्हे तर २० लाख रुपयांची मदत केली आहे. यातून दारिद्र्य रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर या मदतीचा फायदा CINTAAच्या ५ हजार सदस्यांनाही होणार आहे. याविषयी ऋतिकचे आभार मानताना CINTAAचे महासचिव, अमित बहल म्हणाले की, “ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या ५००० सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे.”

गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचे संकट आणखी बळावत कायम आहे. देशभरात कोरोना विषाणुमुळॆ झालेली गंभीर स्थिति पाहता अनेक बॉलिवूड कलाकार लोकांच्या मदतीसाठी स्वतःहून धावून आले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशनने हॉलिवूड एका कलाकारासोबत मिळून देशासाठी कोरोना वायरसच्या लढाईत सहभाग घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका अभियाना अंतर्गत त्याने या लढ्याकरिता २७ कोटी रुपये जमा केले होते. याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने हृतिकच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले होते.

https://www.instagram.com/p/CIlQvWml0NB/?utm_source=ig_web_copy_link

कोरोनाच्या या लाटेत अनेकांचे अतोनात हाल होत आहेत. हे पाहता ऋतिक रोशनने या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न केला आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकने CINTAAसाठी २५ लाखाची आर्थिक मदत केली होती. ज्यातून ४ हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली होती.

इतकेच नव्हे तर यातून मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्स पासून फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान देण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर आणि कंसेंट्रेटर्स उपलब्ध करून देण्यापर्यंतची जवळ जवळ सगळीच शक्य ती कामे ऋतिक करत आहे. यामागे त्याचा केवळ अनेक गरजू लोकांची मदत करत राहणे इतकाच हेतू आहे.

Leave a Comment