आता मुंबईला येणं जाणं महागणार; टोल दरात मोठी वाढ

mumbai toll hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गावावरून आता मुंबईला (Mumbai)  जाणे खिशाला परवडणार नाही. कारण MSRDC अंतर्गत असलेल्या टोलनाक्यावर टोल दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे. खरं तर मुंबईत प्रवेश करतानाच पाच ठिकाणांवर टोलनाके (Mumbai Toll Plaza) आहेत. यामध्ये ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर (एलबीएस) आणि मुलुंडमध्येच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असलेल्या टोलनाक्याच्या समावेश आहे. या सर्व टोलमध्ये आता दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.

कधीपासून टोल दरात वाढ होणार –

नवे टोल दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. नव्या टोल दरानुसार, मुबंईत प्रवेश करताना असलेल्या टोल नाक्यावर आता असलेल्या दरात लहान चारचाकी कार साठी 5 रु. वाढ केली आहे. तर मिनी बस साठी 10 रु. आणि ट्रक व बसेस साठी तब्बल 20 रु. टोल दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता लहान कार साठी मुंबई मध्ये प्रवेश करताना 40 रु. ऐवजी 45 रु. द्यावे लागतील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 27 सप्टेंबर 2002 च्या अधिसूचनेमध्ये दर तीन वर्षांनी टोलचे दर वाढवण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार टोल वाढवला जात आहे.

टोल दर वृद्धीचे कारण :

मुंबई मध्ये प्रवेश करण्यासाठी पाच वेगवेगळ्या ठिकाणी 2002 पासून टोल सुरु करण्यात आला. हे टोल 25 वर्ष्याच्या कालावधीसाठी सुरु राहणार आहेत. करार करताना त्यामध्ये दर तीन वर्ष्यानी टोल दरात वृद्धी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार टोल दरात वाढ करण्यात आली आहे. हा टोल पुढे 2027 पर्यंत चालू राहील.

सध्या किती आहेत टोल दर

सध्या कारसाठी 40 रुपये, मिनीबससाठी 65 रुपये, ट्रक/बससाठी 130 रुपये टोल दर आहे. त्याचबरोबर या पाच एंट्री पॉइंटवर अवजड वाहनांकडून 160 रुपये टोल वसूल केला जात आहे. आता तो वाढून कारसाठी 45 रु. मिनिबससाठी 75 रु. ट्रक व बसेससाठी 150 रु. होईल.