नवी दिल्ली । भारताने 2021 मध्ये 1,050 टन सोने आयात करून 10 वर्षांचा आपला जुना विक्रम मोडला आहे. भारताने सोने आयातीवर एकूण $55.7 अब्ज खर्च केले. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. 2020 मध्ये भारताने 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात केले.
भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. 2021 मध्ये या मौल्यवान धातूच्या आयातीचा पूर्वीचा विक्रमही मोडला. यापूर्वी 2011 मध्ये 53.9 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की,” 2020 मध्ये 430 टन सोने आयात करण्यात आले होते, तर 2021 मध्ये त्याचे प्रमाण दुपटीने वाढून 1050 टनांवर पोहोचले आहे.”
2021 मध्ये भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली
कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये सोन्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी घट झाली होती. कोरोनाच्या निर्बंधांमुळे लग्न पुढे ढकलणे हे त्यामागील कारण होते. यामुळे 2020 मध्ये भारताने सोन्याच्या आयातीवर फक्त $22 अब्ज खर्च केले. कोरोनाव्हायरस महामारीमुळे 2020 मध्ये अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या वर्षी मागणी प्रचंड होती. मार्च 2020 मध्ये भारताने अतिशय कडक लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवनही ठप्प झाले होते.
मोठ्या संख्येने विवाह पुढे ढकलण्यात आले, जे भारतात सोने खरेदीचे प्रमुख कारण मानले जाते. याशिवाय अक्षय्य तृतीया सारख्या सणाला लोकं सोन्याची जोरदार खरेदी करतात, मत्र लॉकडाऊनमुळे हा सणही फारच कमी प्रमाणात साजरा झाला आणि ज्यामुळे मागणी देखील खूपच कमी राहिली.
किंमती घसरल्याने मागणीही वाढली
ऑगस्ट 2020 मध्ये, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 56,191 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचली होती, जो एक नवीन विक्रम होता. मात्र मार्च 2021 मध्ये ही किंमत 43,320 रुपयांवर परत आली. त्याच महिन्यात 177 टन सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 86 टन सोने आयात करण्यात आले होते, जे डिसेंबर 2020 मधील 84 टनांपेक्षा किंचित जास्त होते.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ती कमी झाली. दुसऱ्या तिमाहीत ही मागणी 10 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 7 टक्के होती. तिमाहीत. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीत 831 टन सोन्याची खरेदी झाली.