व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

… नया है वह; सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे मोठे वक्तव्य केले होते. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. असे बोलण्यासाठी कुणी महत्त्वाचा माणूस लागतो,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते सत्तार यांनी भाजप शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, भाजप शिवसेना युतीबाबत बोलणाऱ्या सत्तार यांना शिवसेनेबद्दल काहीच माहिती नाही. ते अजून पक्षात नवीन आहेत. अशा पकारची विधाने करायला कुणी तरी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे.

यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकांकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्राकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. ज्या प्रकारचे काळे कायदे ते विना चर्चेचे, मध्यरात्री पारित करत असल्याचा पळपुटेपणा महाराष्ट्राने पाहिला नसून त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.