न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करत राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतीचे हजारो शौकिनांच्या शिट्या व टाळ्यांच्या गजरात तसेच जय शिवाजी जय भवानीच्या निनादात राज्यात पहिल्याच मानाच्या झालेल्या शर्यती संपन्न झाल्या. जनरल बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याना रोख 1 लाख रूपये बक्षिस देण्यात आले. तर दुसरा क्रमांक डफळापूरच्या अवि माने यांनी मिळविला.70 हजार रूपये रोख बक्षिस मिळविले तर 50 हजार रुपयांचे तिसर्या क्रमांकांचे बक्षिस कुलोठीच्या बाळू नाईक यांच्या बैलगाडीने मिळविला. ब गटामध्ये सतीश बिद्री,बाळू खामकर,अक्षय भोसले यांच्या बैलगाडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

आदत अ गटात सचिन सर्वदे – जाखापूर यांनी प्रथम तर श्रीकांत हजारे- कुकटोळी यांनी द्वितीय तर संतोष गडदे- अंकले यांनी तृतिय क्रमांक पटकावला. आदत गटात बाळू डोंगरे-मिरज,राजू पाटील- कोंगनोळी व ज्ञानू देवकाते- कुलोती यांच्या बैलगाडीला अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या बैलगाडी शर्यतीसाठी सर्व गटासाठी एक कि.मी.चे अंतर ठेवण्यात आले होते.बैलगाडी गाडीवान व बैलांची वैद्यकीय तपासणी करून शर्यती सोडण्यात येत होत्या.विना लाठी,विना काठी तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटीचे पालन करण्यात येत होते.

Leave a Comment