माणसालाही Bird Flu होऊ शकतो? WHO चा गंभीर इशारा

Bird Flu Human
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू नंतर बर्ड फ्लू (Bird Flu) जगासाठी नवा धोका बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. सामान्यपणे पक्षी आणि अन्य सस्तन प्राण्यांना होणारा बर्ड फ्लू माणसासाठी सुद्धा धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे.

बर्ड फ्लू हा एव्हियन इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. सामान्यतः हा रोग पोल्ट्री तसेच इतर पक्षी आणि सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकतो. परंतु, नुकत्याच झालेल्या WHO च्या विश्लेषणात असे म्हटले आहे की हा रोग मानवांसाठी देखील धोका ठरू शकतो. याचे कारण म्हणजे H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. काही प्राण्यांमध्ये अशी प्रकरणेही समोर आली आहेत. अशा स्थितीत प्राण्यांपासून माणसांमध्ये त्याचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

पूर्वी सुद्धा मानवांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे मात्र यासंदर्भात अत्यंत दुर्मिळ प्रकरणे समोर आली होती. WHO चे प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, H5N1 चे पहिले प्रकरण 1996 मध्ये नोंदवले गेले होते. आम्ही मानवांमध्ये H5N1 चे अत्यंत दुर्मिळ केसेस पाहिल्या आहेत. परंतु परिस्थिती अशीच राहील असे आपण मानू शकत नाही. परिस्थितीतील कोणत्याही बदलासाठी आपण तयार असले पाहिजे. गेल्या काही आठवड्यांमध्ये मिंक, ओटर्स, फॉक्स आणि समुद्री सिंहांसह सस्तन प्राण्यांमध्ये H5N1 एव्हियन इन्फ्लूएंझा संसर्गाची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत असं त्यांनी म्हंटल. त्यामुळे प्राण्यांमधून माणसाला बर्ड फ्लूचा धोका होण्याची शक्यता आहे.