ताैक्ते चक्रीवादळाचा पहिला बळी, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  रायगड जिल्ह्यातील उरण येथे ताैक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेला आहे. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

रत्नागिरीत चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खाब कोसळले आहेत. विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील काजुवाडी येथील वस्तीमध्ये दोन घरांवर झाड पडलेली आहेत. नगरपालिका यत्रंणानी तात्काळ घटनास्थळी हजर झाले असून कटरच्या सहाय्याने झाड तोडुन बाजुला करण्याचे मदत कार्य चालु आहे. या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

पनवेल, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी लावली गेलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेले आहे.  वादळाचा धोका असल्याने आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झाले आहे.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/251471280048006

सातारा जिल्ह्यालाही चक्रीवादळाचा फटका

साताऱ्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील पाचगणी, वाई, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यातील परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पाचगणी शहरात विजेचे खांब, झाडे पडलेली आहेत. तर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता.

Leave a Comment