नवी दिल्ली । IT क्षेत्र 2021 मध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. एका रिपोर्ट्स नुसार, 2021 मध्ये IT क्षेत्रात आतापर्यंत 14,97,501 लोकांची भरती करण्यात आली आहे. IT क्षेत्रात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या. या वर्षात आतापर्यंत TCS ची कर्मचारी संख्या 5.06 लाखांहून जास्त झाली आहे.
एक्सिस बँकेच्या खाजगी बँकिंग व्यवसाय बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या रिपोर्ट्स नुसार, 2021 मध्ये, IT क्षेत्रानंतर फायनान्सिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वाधिक भरती दिसून आली. यावर्षी आतापर्यंत या क्षेत्रात 10,36,605 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2021 मध्ये कोणत्या सेक्टरमध्ये किती भरती झाल्या
एचडीएफसी बँकेने आर्थिक क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या. या वर्षी एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,20,116 वर गेली आहे. ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनेंट्स सेक्टरने या कालावधीत 5,57,191 लोकांना रोजगार दिला. मदरसन सुमी सिस्टम्सने या सेक्टरमध्ये सर्वाधिक भरती केली आहे. हेल्थकेयर सेक्टरमध्ये हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक रोजगार देणारे सेक्टर ठरले आहे, ज्यामध्ये यावर्षी 5,40,686 लोकांची भरती करण्यात आली आहे.
कंस्ट्रक्शन सेक्टरमध्ये 5 लाखांहून अधिक नोकऱ्या मिळाल्या
यावर्षी आतापर्यंत कंस्ट्रक्शन आणि इंजीनियरिंग सेक्टर्समध्ये 5,25,145 लोकांना नोकऱ्या मिळाल्या असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ सर्व्हिस सेक्टरमध्ये 5,01,818, टेलीकम्युनिकेशनमध्ये 3,44,199, कंज्यूमर गुड्स सेक्टरमध्ये 3,29,785, मेटल अँड मायनिंग सेक्टरमध्ये 2,38,567 आणि कंस्ट्रक्शन मटेरियल सेक्टरमध्ये 1,92,742 लोकं होते.
टॉप 500 कंपन्यांचे मूल्य GDP पेक्षा जास्त आहे
हुरुनच्या रिपोर्ट्स नुसार, कोरोना महामारी असूनही, मूल्यांकनाच्या बाबतीत भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये यावर्षी चांगली वाढ झाली आहे. या सर्व 500 कंपन्यांचे एकूण मूल्य सुमारे 228 डॉलर्स आहे. त्यांचे मूल्य आर्थिक वर्ष 2021 च्या भारताच्या GDP पेक्षा जास्त आहे. यातील 200 कंपन्यांची मार्केटकॅप यावर्षी दुप्पट झाल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.