नवी दिल्ली । पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा कमाईचा सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसद्वारे एक विशेष योजना चालवली जाते, ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (Post Office MIS) असे या योजनेचे नाव आहे, ज्याद्वारे तुम्ही दरमहा निश्चित उत्पन्न मिळवता. मासिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तुम्ही दरमहा 4950 रुपये कमवू शकता.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये पत्नी आणि पती प्रत्येक महिन्याला मिळून कमाई करू शकतात. यामध्ये तुम्ही जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता.या योजनेत तुम्हाला दुहेरी फायदा कसा मिळेल ते जाणून घ्या.
वर्षाला खूप कमाई होईल
या योजनेत जॉईंट अकाउंट द्वारे, तुमचा नफा त्यात दुप्पट होतो. आज आम्ही तुम्हाला या विशेष योजनेबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत, या योजनेत सहभागी होऊन पती पत्नी या योजनेद्वारे वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात.
MIS योजना काय आहे ?
MIS योजनेत उघडलेले खाते सिंगल आणि जॉईंट दोन्ही पद्धतीने उघडता येते. सिंगल खाते उघडताना तुम्ही या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीती जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. मात्र, जॉईंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. रिटायर्ड कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे.
फायदे काय आहेत?
MIS ची चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोकं मिळून जॉईंट अकाउंट उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान दिले जाते. तुम्ही कधीही जॉईंट अकाउंट सिंगल अकाउंटमध्ये रूपांतरित करू शकता. तुम्ही सिंगल अकाउंटचे जॉईंट अकाउंटमध्ये रूपांतर देखील करू शकता. या खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी, सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज द्यावा लागेल.
योजना कशी काम करते ?
या योजनेत सध्या तुम्हाला 6.6 टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. योजनेअंतर्गत, तुमच्या एकूण ठेवींवरील वार्षिक व्याजाच्या आधारे रिटर्न मोजला जातो. यामध्ये तुमचा एकूण रिटर्न वार्षिक आधारावर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक महिन्यानुसार त्याचे 12 भाग केले जातात. तुम्ही दर महिन्याला तुमच्या खात्यात हा भाग मागू शकता. जर तुम्हाला मासिक आधारावर याची गरज नसेल, तर ही रक्कम मूळ रकमेत जोडल्यास त्यावर व्याज देखील मिळते.
उदाहरणासह उत्पन्न कसे असेल ते समजून घ्या
समजा या योजनेअंतर्गत पती-पत्नीने जॉईंट अकाउंटमध्ये 9 लाख रुपये गुंतवले आहेत. 9 लाख ठेवींवर 6.6 टक्के व्याजदराने वार्षिक रिटर्न 59,400 रुपये असेल. 12 भागांमध्ये विभागले तर ते मासिक 4950 रुपये होईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यात दर महिन्याला 4950 रुपये मागू शकता. त्याच वेळी, तुमची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाईल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ही योजना 5 वर्षांनी आणि आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.