मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार थेट पुलावरून खाली कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – मुंबईहून धुळ्याच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव कारला भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाण पुलावर हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जात असलेली किया सोनेट हि कार हॉटेल दिव्य अभिलाशा समोरील पूल चढत असताना पुलावरून थेट खाली कोसळली आहे. यावेळी कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात (Accident)  घडला आहे.

या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघर येथील सुनील जैन आणि त्यांच्यासोबत दोन महिला या गाडीतून प्रवास करत होत्या. या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस, अग्निशमन दलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. या अपघातात किया सोनेट या गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

कालदेखील सोलापूर जिल्ह्यात एसटी बसला भीषण अपघात (Accident) झाला होता. सटी बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. ही अपघातग्रस्त बस अक्कलकोट हून कल्लाप्पावाडीच्या दिशेने जात होती. यादरम्यान हा अपघात घडला. हि एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment