नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

0
70
Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहित राजेंद्र चव्हाण आणि पूजा रोहित चव्हाण अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नींची नावे आहेत.

हि सगळी घटना मंगळवारी दुपारी रत्नागिरीच्या कुवारबाव या ठिकाणी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने रोहित याने नैराश्येतून हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरीमधील कुवारबाव या ठिकाणी रोहित आणि पूजा हे दोघे पती पत्नी आपल्या लहानमुलीसह राहत होते.

मंगळवारी दुपारी रोहित आणि पूजाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळुन आला होता. पूजाचा मृतदेह बिछान्यावर होता तर रोहितचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकत होता. रोहितने पूजाचा खून करुन त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here