कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या ग्रामपंचायत आवारात पतीनेच बायको आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. अडकित्ताच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात वार वर्मी लागल्याने दोघेही गंभीर जखमी होऊन उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मांजबाई कावणेकर आणि त्यांचे पती सदाशिव कावणेकर यांच्यात कौटुंबिक वाद होता.आज ग्रामपंचायत कार्यालयात मांजबाई मेहुणा केरबा येडके याच्यासोबत उतारे काढण्यासाठी आल्याची माहिती सदाशिव कावणेकरला मिळताच तो त्याठिकाणी दाखल झाला. यावेळी उतारे काढण्यावरून दोघं नवरा-बायकोत शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान, झालेल्या झटापटीत पतीने मेहुणा आणि बायकोवर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेतानाअ तिरक्तस्राव झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत हल्ल्यातील हत्यार जप्त केले. या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.