धक्कादायक ! प्रेयसीच्या मदतीने पतीने आपल्या पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला फासावर लटकवले

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दौंड : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रेमात अडथळा येत असल्याने प्रेयसीच्या मदतीने स्वतःच्याच पत्नीला व ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी सचिन सोनवणे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये घडली आहे. यवत पोलिसांनी या घटनेचा उलगडा काही तासांत केला आहे. मंगळवारी लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे या मायलेकरांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. सर्वात पहिले मृतदेह १० वर्षांच्या वैष्णवीने पहिले होते. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला.

मुलीचा जबाब घेऊन पोलिसांनी पती सचिन सोनवणे याची चौकशी सुरु केली. यवत पोलिसांनी या घटनेची सखल चौकशी केली असता हि आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जेव्हा सचिन सोनवणे याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे कबुल केले. पोलिसांनी अवघ्या १ दिवसात या घटनेचा छडा लावला. या प्रकरणी सचिन सोनवणे याला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.