धक्कादायक ! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले आणि त्यानंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – एका तरूणाने पत्नीचे आंघोळ करतानाचे, झोपतानाचे आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडीओ बनवून आपल्या भावोजीला पाठवले. त्यानंतर भावोजीने ग्वाल्हेरला येऊन आपल्या मेहुण्याच्या पत्नीवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. यानंतर पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे तर आरोपी भावोजीने म्हणजे रायपूरमध्ये माजी मंत्र्याच्या सुरक्षेत कार्यरत असलेल्या पीएसओने सुसाइड नोट लिहून स्वत:वर बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये भावोजीने मेहुण्याच्या पत्नीकडून आणि सासऱ्याकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याबाबत लिहिलं आहे. मृतकाची पत्नी जवळपास दीड महिन्यापूर्वी रायपूरला निघून गेली होती. सुसाइड नोटमध्ये ३० लाख रूपये मागितल्या बाबतही लिहिले आहे

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि तिचा पती गपचुपपणे तिचे अश्लील व्हिडीओ बनवून भाओजीला पाठवत होता. भावोजी रायपूरमध्ये व्हिआयपी बटालियनमध्ये कार्यरत आहे. तसेच जेव्हा भावोजी घरी आला तेव्हा पतीसमोरच त्याने अश्लील चाळे केले. यानंतर या महिलेने पतीकडे तक्रार केली तर त्याने तिला भावोजीसोबत संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. नंतर आरोपी भावोजीने तिच्यावर बलात्कार केला.

Leave a Comment