धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील पलवलमध्ये दोन महिन्यांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. हा खून मृत व्यक्तीच्या पत्नीसह त्याच्या भाच्याने केला होता. मृत व्यक्तीची पत्नी आणि मृत व्यक्तीच्या भाचा यांच्यात अनैतिक संबंध होते. यातूनच हि हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना लवकरच न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे.

पलवलच्या होडल भागात राहणाऱ्या महेश यांनी 9 ऑक्टोबर रोजी होडल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 8 ऑक्टोबर रोजी त्यांचा लहान भाऊ ताराचंद हा नेहमीप्रमाणे शहरातील नर्सिंग होममध्ये कामासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्यांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

ताराचंद यांची शोधाशोध केल्यानंतर त्यांची मोटारसायकल हसनपूर रस्त्याच्या दिशेने कच्च्या रस्त्यावर आढळून आली. यानंतर महेश यांनी मोटारसायकल जवळ जाऊन पहिले असता त्यांचा भाऊ ताराचंद हा तेथे दुचाकीजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. यानंतर ताराचंदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला.