हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता पती पुढे..; घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे मनाला चटका देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्ठुर पतीने संशयी वृत्तीतून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच करून न थांबता आरोपी पत्नीचे शेर घेऊन रस्त्यावर फिरत होता. हा सर्व प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आता हा आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

असा घडला सर्व प्रकार….

समोर आलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसारा गावामध्ये घडली आहे. आरोपी असलेल्या पतीचे नाव अनिल असे आहे. अनिलला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरून त्याने अनेकवेळा आपल्या पत्नीशी वाद देखील केले. शेवटी शुक्रवारी झालेल्या वादामध्ये त्याने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याने थेट पत्नीचे शीर धडा वेगळे केले.

एवढेच करून न थांबता तो पत्नीचे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला. यावेळी त्याचे हे भयंकर रूप पाहून सर्वांनाच भीती वाटली. त्यामुळे काही लोकांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. यानंतर घटनास्थळी घेऊन पोलिसांनी अनिलला अटक केली. तसेच शीर आपल्या ताब्यात घेतले. आता पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या सर्व घटनेचा तपास ते करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सांगितले जात आहे की, आरोपी अनिल हा एक मानसिक रुग्ण आहे. ज्यावेळी तो रस्त्यावर पत्नीचे शीर घेऊन फिरत होता तेव्हा अनेक ठिकाणी तो बसला. लोकांना बोलत होता. काहीजण सांगतात की, अनिल आपल्या पत्नीचे शीर घेऊन नाचत देखील होता. हे दृश्य पाहून अनेकांच्या मनात धडकी बसली. कोणालाही त्याच्याजवळ जाऊ वाटले नाही. आता अनिलला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच परिसरात देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.