हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातवरण  निर्माण झाले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र आता अचानक एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते आता ठणठणीत झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25 हजार 504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. तसेच दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एक कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’