Sunday, January 29, 2023

मला देखील अनेक ऑफर होत्या, पण मी कधीच शिवसेना सोडली नाही- चंद्रकांत खैरे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला देखील अनेक ऑफर होत्या पण मी कधीच शिवसेना सोडली नाही. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहीन अस मत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे. शहराला खासदारकिची गरज होती पण आदित्य ठाकरे यांना ते आवडले नसल्याच देखील खैरे यांनी संगितले.

शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल, अशी चंद्रकांत खैरे यांची अपेक्षा होती पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल खैरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते बोलत होते.

- Advertisement -

खैरे म्हणाले मी माझ्यासाठी खासदार की मागत नव्हतो तर औरंगाबाद शहराला शिवसेनेच्या खासदाराची आवश्यकता होती. परंतु आदित्य ठाकरे यांना हे आवडले नाही मी शिवसैनिक म्हणून काम करीत राहणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी सच्चा शिवसैनिक आहे. त्यांच्या बरोबर मी अनेक वर्ष काम केल आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील काम केलं आहे. आता नवीन लोकांना संधी द्यावी असे त्यांना वाटत आहे. राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळाले असते असही खैरे म्हणाले.