एकनाथ शिंदेंचा मलाही फोन आला होता, आमदार अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असे फूट शिवसेनेत पडली आहे. त्यातच आता शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांनी तळ ठोकला आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहे. यादरम्यान आता औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे (ambadas danve) यांनी शिंदे गटाने ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

औरंगाबाद शहरातील आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (ambadas danve) यांनी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समोर एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांचा मलादेखील फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, असे उत्तर दानवेंनी (ambadas danve) दिले.

आपल्या येथील काही आमदार तुम्हाला सांगतील तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. पण त्याला सांगा तुला निवडून मी आणलंय. तुला निवडून येण्यासाठी आम्ही काम केलं, असं सांगा, असे आवाहन आमदार अंबादास दानवें (ambadas danve) यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ‘कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही. कुणी म्हणेल तुमच्यासाठी इतकं काम केलं आहे, पण शिवसेना होती म्हणून तुम्ही ते काम केलं होतं बाकी, काही नाही, असा टोलादेखील अंबादास दानवे (ambadas danve) यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Leave a Comment