हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र याबाबत आता स्वत: संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे म्हणाले, ‘मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक आहेत. त्यांनी माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच दिवशी तसं जाहीर ही केलं आहे. अजून आठ-नऊ दिवस आहेत, असं ते म्हणाले होते. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.