मी बांगड्या घालून, शेपूट घालून गप्प बसणारा नाही : छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | बॅंकेत अनियमितता आहे की नाही हे मला माहिती नाही, मी उत्तर देणारापैकी आहे. मी बागड्या घालून, शेपूट घालून गप्प बसणारा नाही. माहिती मागविली आहे, चेअरमन दिली तर ठीक आहे. माझे तत्व आहे, मी गालबोट लावून घेणार नाही असा इशारा छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा खाजगीकरण झाल्यानंतर त्या कारखान्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज का दिले, असा प्रश्न छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला आहे. जरंडेश्वर चे खाजगीकरण गुरु कमोडीटी या कंपनीकडे गेले, आज पर्यंत लोक या गुरुचा गुरु कोण हा प्रश्न विचारत आहेत. सहकारी साखर कारखाना खासगीकरण होताना. शेतकऱ्यांची बँक असलेला सातारा जिल्हा बँकेने खाजगी कारखान्याला कर्ज का दिले.

जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली. याचा आधार घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज खासदार छ. उदयनराजे यांनी मिडीयाशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी बँकेच्या संचालक मंडळावर आणि कामकाजावर टीका केली आहे. सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मालकीच्या असतात. कुठल्याही व्यक्तीमुळे ही बँक नाही. मी दबाव टाकून बँकेत आलेलो नाही. लोकांनी त्यांच्या पैश्याची देखरेख करण्यासाठी मला बँकेत पाठवलं आहे. जे संचालक ज्या गटाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचे अधिकार नाहीत का त्यांना मत मांडण्याचा.

मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार का केला नाही? जरंडेश्वर कारखाना गुरू कमोडिटीच्या ताब्यात आहे, मात्र याचा गुरू कामोडीटीचा गुरू कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

तुम्ही 10 तारखेच्या आत माघार घ्या, मीही माघार घेतो

ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या ते पुन्हा सहकारात कसे काय? ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीत काढल्या त्यांनी 10 तारखेच्या आत फॉर्म माघारी घ्यावेत. माझी पण माघार असेल, असे सांगत आमदार शिवेंद्रराजे यांच्या मोडकळीत आलेल्या अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेवर निशाण साधत शिवेंद्रराजेंवर नाव न घेता छ. उदयनराजे यांनी टोला लगावला.

Leave a Comment