जावयाला अटक केल्यानेच मालिकांचा थयथयाट होतोय; यास्मिन वानखेडेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच त्याचा थयथयाट होतोय,” अशी टीका यास्मिन वानखेडे यांनी केली आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यावेळी यास्मिन वानखेडे म्हणाल्या की, नवाब मलिक हे फक्त ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत आहेत.

नवाब मलिक हे एक मंत्री आहेत. अशा मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला असे करणे शोभत नाही. मलिकांकडून माध्यमांना सध्या चुकीची माहिती दिली जात आहे. समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला हा मलिकांना मिळत नाही. ते का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. तुमचे सर्टिफिकेट कुणी काढले आहे का? असा सवालही यावेळी यास्मिन वानखेडे यांनी केला.