माजी खासदार असा उल्लेख चंद्रकांत खैरेंना टोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चार केला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले आहेत . मात्र हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . कोणत्याही कार्यक्रमात आता चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख येतो. अशाच एका कार्यक्रमात खैरे या शब्दावर भडकले. “काय माजी खासदार-माजी खासदाय लावलंय. मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात”,असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

औरंगाबादमध्ये क्रेडाईच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

“मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जात आहे. मी खासदार होतो हे सत्य असले, तरी मी आजही शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळेच लोक रोज त्यांची कामे घेऊन माझ्या कार्यालयात येतात”, असे सांगत खैरे यांनी आपली भूमिका मांडली असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. “मी खासदार झालो आहे याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही”, असा टोला जलील यांनी खैरेंना लगावला.