विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नव्या अध्यक्षासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. अशातच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी साकारला टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय अशी पतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

”महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय”, अशी प्रतिक्रिया नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात मोदी सरकार महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पाच ते सातपट जास्त मदत मिळत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य 3 लाख 5 हजार 611 कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.