कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अनेक वादग्रस्त वक्तव्य करतात. शास्त्राने सिध्द केलेले आहे, जगामध्ये मनुष्याला आजार झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. पुरातन काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. कालातरांने विज्ञान पुढे गेलं आजाराच्या बाबतीत संशोधन होवू लागले. आज आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर हे समाजाचे फार मोठी गरच आहे. त्यांची तुलना होवू शकत नाही. संभाजी भिडेंच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करत असल्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कराड येथील वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये 5 मे टन प्रतितास क्षमतेच्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी या नावीन शुभारंभ झालेल्या यंत्रनेमुळे भागातील शेतक-यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्य सरकार चांगला मार्ग काढेल ः बाळासाहेब पाटील
अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे देण्यात आलेल्या कर्जाच्या व्याजाच्या परताव्याबाबत संबधित अधिका- यांशी चर्चा करेन. राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयातून निश्चित चांगला मार्ग काढेल, असा विश्वास मंत्री बाळासाहेब पाटील व्यक्त केला..
काय म्हणाले, संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात 105 टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले.