मला कळत नव्हते, मी हाफ चड्डीत होतो : खा. छ. उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
रयत शिक्षण संस्थेचा पदसिध्द अध्यक्ष हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असतो, मग असं काय झाले की बदल केला. हे बदल करणारे कोण? काही लोकांना सवय असते, तुझ पण माझचं, माझ पण माझचं, त्याचं पण माझचं. माझं म्हणणं आहे, मला घेऊ नका, पण हे घेणारे कोण? माझ्या आज्जीने जागा रयतला दिली. त्यावेळी मला कळत नव्हते, मी हाफ चड्डीत होतो. ह्यांनी काय दिल आहे. ह्यांनी नुसतं अोढलयं. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून टाका. संख्या ज्यांची जास्त आहे, त्यांचा पक्ष असतो. त्याप्रमाणे ज्या कुटुंबाची संख्या त्याचे नाव लावून टाका. मग रयतला आता पवार शिक्षण संस्था नाव लावून टाका असा टोला शरद पवारांना लागवला आहे.

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या कामावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचार केला असल्याची टीका केली होती. याला उदयनराजेंनी उत्तर देत ग्रेड सेपरेटर 1 आठवड्यासाठी बंद ठेवा म्हणजे कळेल. शिवेंद्रराजेंना पैसे खाण्यापलीकडे काही माहिती नाही. मी काय पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे. आम्हाला खायची सवय नाही तर काम करायची सवय आहे, असाही टोला खा. उदयनराजे भोसले यांनी लगावली.

म्हसवड येथील मुंबई बेंगलोर कॅरिडॉरवरून आमदार जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात वादावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आता लोकच पेटली आहेत. माझं म्हणणं आहे दोन्हीकडे कॉरिडॉर करून टाका म्हणजे वादच मिटेल.