मी कधी सोन्याची तस्करी केली नाही, भंगारवाला असल्याचा मला अभिमान- नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजप आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच होय मी भंगारवाला आहे आणि मला याचा अभिमान आहे, मी कधी चोरी केली नाही, किंवा बँकेचे पैसे लुटले नाहीत असे मलिक यांनी म्हंटल.

मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो.  नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्याचे नट बोल्ट काढून त्याचे पाणी बनवणार, असंही मलिक म्हणाले

मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? असा सवाल मलिक यांनी केला. तो फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? असा सवाल मलिक यांनी केला.