Friday, June 9, 2023

मी २१ वर्षे झाले जिल्ह्याचा आमदार; गोरेंच्या आरोपावर बाळासाहेब पाटलांचे प्रत्युत्तर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात भाजप आमदार जयकुमार गोरे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहे. जिल्ह्यातील कोरोना काळात बाळासाहेब पाटील किती अस्तित्वात होते असा सवाल जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गोरेंवर पलटवार केला. मला या आरोपांबद्दल काही माहिती नाही मात्र, मी गेली २१ वर्षे झाले जिल्ह्याचा आमदार आहे, असे पाटील यांनी म्हंटल आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना काळात जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी केलेल्या कामावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातील कोरोना काळातील अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करीत त्यांना टोला लगावला होता. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलेला आरोपा बद्दल माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना विचारणा केली असता पालकमंत्री चांगलेच संतापले.  “मी कुणाच्या आरोपांना उत्तर देत नाही. मी राजकीयही काही बोलत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी व काय आरोप केले ते मला माहीत नाही. मी गेली २१ वर्षे झाले आमदार आहे,” असे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना उत्तर दिले.

जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले…

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी “या जिल्ह्यात पालकमंत्री कोण आहे हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिह हेच आहेत असे वाटते. त्यामुळे पालकमंत्र्यांचे कोरोना काळातील अस्तित्व हे किती आहे हे माहिती नाही,” असे गोरे यांनी म्हंटले आहे. आता गोरे यांच्या या आरोपावर संतापून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली आहे.