हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार आमदार मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर येत होती. परंतु आता खुद्द अमोल मिटकरी यांनी हे वृत्त फेटाळले असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून माझी प्रकृती उत्तम आहे असं म्हंटल आहे.
यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हंटल की, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल असे अमोल मिटकरी यांनी म्हंटल.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.@NCPspeaks pic.twitter.com/Pscr6jr7K2
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2021
कोण आहेत अमोल मिटकरी –
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असून आपल्या दमदार वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अत्यंत कमी वेळेत आपली छाप पाडली. 2019 मध्ये अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडून गेले असताना अमोल मिटकरी यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर भाजपला अंगावर घेतले.