दिल्लीच्या निकालावर शरद पवार म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७०जागांवर मतमोजणी सुरु आहे. ‘आप’ने सुमारे ६२ जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे ८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सर्व जागांवर पिछाडीवर आहेत. दरम्यान, या आकडेवारीनंतर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली आहे.

दरम्यान, दिल्लीत लागलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हे भाष्य केलं आहे. देशातील नागरिक मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला कंटाळले आहेत. झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीतही असाच कौल मिळाला, मध्यप्रदेश, छत्तीसगढलाही हेच झालं. भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही. लोकांना स्थिर आणि विकासाला चालना देणारं सरकार हवं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं.

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने धार्मिक भावना चेतवून दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दिल्लीत धार्मिक कटुता कशी निर्माण होईल याचीही काळजी घेतली. गोळी मारा सारख्या दिल्या गेल्या. त्या सगळ्याला जनतेने योग्य ते उत्तर दिलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदनही शरद पवार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभेच्या ७ जागांवर राष्ट्रवादीने सुद्धा आपले उमेदवार उभे केले होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment