प्रकाश पटेल हत्याकांडाचे पोलिसांकडे पुरावेच नाहीत; हल्लेखोरांचं रेखाचित्र जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । कुरिअर कंपनीचे व्यवस्थापक आणि व्यापारी प्रकाश भाई पटेल यांची 31 जानेवारी रोजी नगरखानागल्लीत दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक गुजरातला गेले होते. मात्र तेथून ते रिकामेच परतले आहे.

दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी प्रकाश पटेल यांच्यावर दिवसाढवळ्या 31 जानेवारी रोजी नगरखाना गल्लीत हल्ला केला होता. हे हत्याकांड घडून अकरा दिवस उलटले आहे. पटेल हे मूळचे गुजरातचे असल्याने या हत्येचे धागेदोरे गुजराथशी जोडलेले असावे असा संशय पोलिसांना होता. त्यासाठी सिटीचौक पोलीस ठाण्याचे एक पथक मागील अनेक दिवसांपासून गुजराथ मध्ये तळ ठोकून होते.तेथे पथकाने अनेकांची चौकशी केली मात्र चौकशीत काहीही महत्वाचे निष्पन्न झाले नाही.शेवटी निराश होऊन सिटीचौक पोलिसांना रिकाम्या हातानीच औरंगाबादला परतावे लागले. सिटीचौक पोलिसांचे पथक 9 फेब्रुवारी रोजी शहरात परतले.

सिटीचौक पोलीस,गुन्हेशाखा, विशेष पथके यांच्या हाती काही लागले नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा, परिसरातील नागरिक यांच्या मदतीने हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधल्याने रेखाचित्र हुबेहूब जरी नसला तरी मिळता जुळता आहे.यामुळे हल्लेखोरांचा सुगावा लावण्यात यश येईल अशी पोलिसांना अपेक्षा आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment