सुषमा अंधारेंना मी 2 चापट्या लगावल्या; ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीड येथे ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. यावेकी तेथे उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे यांना आपण २ चापट्या लगावल्याचा दावा सुषमा अप्पा जाधव यांनी केला आहे. याबाबतचा त्यांचा विडिओ समोर आला आहे.

संबंधित व्हिडीओत अप्पा जाधव म्हणाले, “सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. त्याच्या ऑफिसमध्ये एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. त्यावेळी मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.”

दरम्यान, पक्षातील या वादानंतर उद्धव ठाकरेंनी आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचीही तडकाफडकी हकालपट्टी केली. शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दोघांची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती दिली. ‘बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशी माहिती राऊत यांनी दिली.