हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र हा ढाचा आम्ही पाडला असून त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो असं विधान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोस सभेत फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला.
बाबरी मशिद प्रकरणी ऐकून ३२ आरोपी पैकी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आदींचा समावेश होता. मात्र तुमचा महाराष्ट्रातील कुठलाच नेता पाहायला मिळत नाही. ज्यावेळी तो ढाचा पाडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात?? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता. असे फडणवीसांनी सांगितलं.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. हनुमान चालीसा म्हणून बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असे शरद पवार सांगतात. मग इफ्तार पार्ट्या करूनही प्रश्न सुटणार नाही’, असा पलटवार फडणवीस यांनी केला.