आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमांतून महिलांचे प्रश्न सोडवणार – सुचेता हाडंबर यांचे अंदोरी येथे प्रतिपादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद प्रतिनिधी ।सुशिल गायकवाड

सर्वच क्षेत्रामधे महिला पुरुषाच्या खांदयाला खांदा लावुन काम करत आहे.प्रत्येकाने महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे.आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातुन महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारअसल्याचे प्रतिपादन खंडाळा तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा व अंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुचेता ऊर्फ छाया हाडंबर यांनी केले.

खंडाळा तालुका महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने अंदोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ”वाण आरोग्याचं” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने महिलांचे ब्लडप्रेशर व हिमोग्लोबिन तपासणी करुन हळदीकुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिपाली साळुंखे,महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस सुचिता साळवे,वृक्षाली घाडगे, पिपंरे बुद्रुकच्या सरपंच कविता धायगुडे, कराडवाडीच्या सरपंच जनाबाई कराडे, कोरेगांवच्या सरपंच रेश्मा गोवेकर,बावकलवाडीच्या उपसरपंच चैत्राली जाधव,संध्या खुंटे,नर्मदा कोकरे,बायडाबाई ठोंबरे, शलाका ननावरे,कल्पना सरक, पल्लवी निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना वृक्षाली घाडगे म्हणाल्या की, महिलांनीच विधवा महिलांना सन्मानाची वागणुक देणे गरजेचे असुन त्यांना विधवा न म्हणता हिरकणी असे संबोधले पाहिजे.यावेळी आरोग्य सेविका शलाका ननावरे यांनी कोविड लसीबाबत माहिलांना मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्यसेविका, नुतन महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment