बालाकोट एअरस्ट्राईकचे हिरो अभिनंदन यांना IAF कडून मिळाली बढती, आता बनले ग्रुप कॅप्टन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय हवाई दलाने बालाकोट एअरस्ट्राईकचे नायक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बढती दिली आहे. अभिनंदन यांना आता ग्रुप कॅप्टन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान मिग-21 ने गोळ्या झाडून पाडले. मात्र, पाकिस्तानी विमानांशी झालेल्या लढाईत अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले.

अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. त्याचे व्हिडिओ पाक लष्कराने सोशल मीडियावर रिलीज केले होते. हे व्हिडिओ नंतर अधिकृत ट्विटर हँडलवरून AFP सह अनेक नामांकित वृत्त संस्थांनी ट्विट केले. यामध्ये अभिनंदनची चौकशी केली जात होती.

भारताने निर्माण केला होता प्रचंड दबाव
अभिनंदनबाबत भारताने निर्माण केलेल्या प्रचंड दबावामुळे पाकिस्तानने त्यांची सुटका केली. हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये केंद्र सरकारबद्दल कसली भीती होती, याची माहिती खुद्द पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली होती. पाकिस्तान विधानसभेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक म्हणाले होते की, “त्यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथरत होते आणि भारतीय हल्ल्याच्या भीतीने त्यांचा चेहरा घाम फुटला होता. बाजवा यांना भारतीय हल्ल्याची भीती होती.”

जेव्हा घाबरला होता पाकिस्तान…
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत मोठा खुलासा करताना म्हटले होते की, भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या भीतीपोटी सोडले आहे. आसिफ म्हणाले की,”पाकिस्तान सरकारच्या मनात भारत सरकारबद्दल एवढी भीती निर्माण झाली होती की, वेळ न घालवता त्यांनी अभिनंदन वर्धमान यांना तात्काळ सोडले आणि भारतासमोर गुडघे टेकले.” ते म्हणाले की,” अभिनंदन वर्धमान यांना भारताला खुश करण्यासाठी सोडण्यात आले.”