हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसात T-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप अगोदर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये मोठे बदल (icc change rules) केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात (icc change rules) येणार आहेत. या बदललेल्या नियमांसह आगामी टी-20 वर्ल्डकप 2022 खेळवण्यात येणार आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशींना दुजोरा मिळाल्यानंतर नियमांमध्ये (icc change rules) हे बदल करण्यात आले. नेमके कोणते नियम बदलले आहेत चला पाहूया…
1) कॅच आऊट झाल्यास हा खेळाडू करणार फलंदाजी
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार (icc change rules)जर एखादा खेळाडू झेलबाद झाला तर नवीन फलंदाज पुढचा बॉल खेळणार आहे. पूर्वी असा नियम होता की जर झेल घेण्यापूर्वी फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले तर दुसऱ्या टोकाला उभा असलेला फलंदाज स्ट्राइकवर यायचा आणि नवा फलंदाज नॉन स्ट्राईकवर खेळायचा.
2) बॉलला थुंकी लावण्यास बंदी
चेंडूला चमक देण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने ते आणण्यात आले होते. मात्र आता हि बंदी कायमस्वरूपी लागू करण्यात आली आहे.
3) 2 मिनिटांत खेळाडूला व्हावे लागेल तयार
फलंदाजाला आता फलंदाजीसाठी कसोटी आणि वनडे सामन्यांत दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेण्यासाठी तयार व्हावे लागणार आहे. टी-20 फॉरमॅटसाठी हा वेळ 90 सेकंदाचा असणार आहे.यापूर्वी, नवीन फलंदाज यासाठी कसोटीत तीन मिनिटे घेत होते.
4) फिल्डरच्या चुकीच्या वर्तणुकीची मिळणार शिक्षा
जर फिल्डिंगच्या वेळेस खेळाडू जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीची वर्तणूक करत असेल तर पंच त्या चेंडूला डेड बॉल तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच रन पेनल्टी म्हणून देण्यात येतील.
5) फलंदाज पिचवरूनही मारू शकतो बॉल
यापूर्वी असा नियम (icc change rules)होता की जर एखादा फलंदाज चेंडू खेळण्यापूर्वी क्रीझच्या बाहेर आला तर गोलंदाज त्याला फेकून धावबाद करू शकत होता, परंतु आता हा नियम काढून टाकण्यात आला आहे. असे केल्यास त्याला डेड बॉल घोषित करण्यात येणार आहे.
6) वनडेमध्ये लागू होणार स्लो ओव्हर रेट नियम
T20 क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दंडाची नवीन तरतूद लागू करण्यात आली आहे. 2023 च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय सामन्यांमध्येही याची अंमलबजावणी केली जाईल. या नियमानुसार (icc change rules) गोलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकाची सुरुवात निर्धारित वेळेत करावी लागते. जर एखाद्या संघाला त्याचे शेवटचे षटक वेळेवर सुरू करता आले नाही, तर त्या कालमर्यादेनंतरच्या सर्व षटकांमध्ये, एका क्षेत्ररक्षकाला सीमारेषेतून काढून तीस यार्डांच्या परिघात ठेवावे लागते. त्यामुळे फलंदाजांना मदत होते. सध्या हा नियम टी-20 क्रिकेटमध्ये लागू असून पुढील वर्षी तो वनडेमध्येही लागू करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?